AYUSH - place for all tribal professionals

AYUSH promo

Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)

This is default featured post 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured post 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured post 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured post 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured post 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

ayush - adivasi yuva shakti

नमस्कार मित्रानो....
आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...
आयुष - आदिवासी युवा शक्ति
आज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...
कार्यक्रमाचे तपशील -
व्यवसाय मार्गदर्शन शिबीर
ठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रह
दिनांक - २८ जून २००९
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५

आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्क
डॉ. सुनील पर्हाड (doctor, REL) -09860383632
वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887
विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत

-आयुष मंच
http://adivasiyuva.blogspot.com/
adiyuva@gmail.com

ayush - adivsi yuva shakti




नमस्कार मित्रानो....

आम्ही आयुष च्या ऑनलाइन केंद्र वरुण बोलत आहोत...
आयुष - आदिवासी युवा शक्ति

आज आयुष तर्फे डहाणू येथे व्यवसाय मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यात आपल्या समाजातील प्रतिष्टीत आणि विविध चांगल्या पदावर असलेले मान्यवर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
तरी आपण सगळ्यांनी उपस्तीत राहून हा कार्यक्रम यशस्वी अक्रण्यास सहाय करावे......आणि आपल्या मित्रांना पण कालवा जेणेकरून ह्या कार्याक्रमचा लाभ जास्त जाणा पर्यंत पोहचेल...

कार्यक्रमाचे तपशील -
व्यवसाय मार्गदर्शन शिबीर
ठिकाण - डहाणू पंचायत समिती सभाग्रह
दिनांक - २८ जून २००९
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ५


आजच्या कार्यक्रमाच्या तपशील साठी संपर्क
डॉ. सुनील पर्हाड (doctor, REL) -09860383632
वसंत भासरा (social worker, TISS)-09422675887
विराज गडग (student)- ०९२२४३२४६१४

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत

-आयुष मंच


**********************************************************************************************************************************************************************************************

तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti
मी बेस आहू.. तू बेस रेहे.... कव्हा येव घरा असा झालाहे... करमं नाय.... हलू हलू जा निही त पडशील.. मी त अथाचाच र.... आपले सगले एकूच आहुत होली खेलाया ये दादू... आठवा नोकों काढू हाव आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ... आपले लोकांना विसरजोस नोको हाव ... कोन्हाला माझा आठव येत होवा का निही... आपली संस्कृति आपली अस्मिता क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........ आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. .... अथ नाचू का कोठं नाचू? माना आठव येय घराचा.... ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय? क्या लाजतोस आपली भाषा बोलाया आलसय आली हे... आपले लोकाना विसरु नोकोस कव्हा येव घरा असा झालाहे... आपली संकृति अपल्याना फ़क्त सनग्राहलायत ठेवायची नाहीये ... आठवा नोकों काढू हाव मी बेस आहू.. तू बेस रेहे.... होली खेलाया ये दादू... क्या लाजतोस आपली भाषा बोलाया आपली संस्कृति आपली अस्मिता आपले लोकाना विसरु नोकोस क्या बिहेतोस?, बिहू नोको ना........ आपले लोकांना विसरजोस नोको हाव ... आपली माती आपली मानसे आपलाच आवाज. .... हलू हलू जा निही त पडशील.. करमं नाय.... आपले सगले एकूच आहुत माना आठव येय घराचा.... आलसय आली हे... मी त अथाचाच र.... अथ नाचू का कोठं नाचू? ज्या शिकातोस त्या रोजचे अयुषात वपरीत जा हाव काय? कोन्हाला माझा आठव येत होवा का निही... तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti **********************************************************************************************************************************************************************************************








--
तारपा बोकुड धान आया जागरण ढोल बयिल बंडी कनसरि मांग्तेरा कोड्या गौरी ढोर सलाता पंगत विद्या धवलेरी दिवा कामड माजर जवुल दूर आंधान भगत पणती नाच पडाल उडवी भुताली सरन टिपरया दिस पूर सूप पुस्तक मण्डली मयत धुमश्या निम्बर भोतड जेवण वाडाय कोकत्रि ढोलकी आग आगोठ उखल निही डोसली पेरण उजेड मुसल लगीन भिंडोडोत वखत पायली वरात भाकर चीचोनी आंबील पेज तांब्या जातां ताडी बोंबील अम्बोसी ठेसा कोलींब adivasiyuva shakti

ayush program @ dahanu, career guidence june 2009

hi friends....

aaj "ayush" che "career guidence" sathi Dahanu yethe prograam aahe....
venue - dahanu panchayat samiti hall.
date - 28 jun 09
time 10am to 5 pm

please attend same & inform to all your frds.

rgrds

दुर्गम भागांत 'ज्ञान'वैभव!



दहावीच्या परीक्षेत यंदा ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ५९ सरकारी माध्यमिक आश्रम शाळांपैकी आठ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू तालुक्यांत २१६ माध्यामिक शाळा असून यात ५९ सरकारी आश्रमशाळांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील अडोशी, गोंडे बुदुक, कोरेगांव तसेच जव्हार येथील कुपोषित बालकांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वांगणी, विनवल, देहेरे तसेच, विक्रमगड येथील कोन्हे, वाडा तालुक्यातील एक अशा एकूण आठ सरकारी आश्रमशाळांनी १०० टक्के यश मिळविले आहे.

तीन-चार वषेर् या आश्रमशाळांत दहावीचे निकाल शून्य ते २० टक्केच लागत होते. त्यामुळे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकार आदिवासी मुलांना शिक्षण देत असूनही त्याचा पुरेसा लाभ आदिवासींना मिळत नाही; केवळ कागदी घोडे नाचवले जातात, अशी ओरड होत होती. यंदा मात्र चित्र बदलले. केवळ पाच टक्के शाळांचा निकाल ५० टक्यांच्या खाली आला आहे. त्यातही डहाणू तालुक्यातील धामणगाव येथील आश्रम शाळेचा निकाल २२. ७२ टक्के व रानकोळ येथील आश्रमशाळेचा निकाल ३१.०३ टक्के इतकाच आहे.

इंग्रजी शाळांमध्ये केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्याार्थ्यांनाच दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. मात्र आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर अशी सक्ती केली जात नसतानाही आश्रमशाळांनी ही कामगिरी केल्याने या शाळांचे कौतुक होत आहे.
original at -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4703878.cms

करिअरच्या वेगळ्या वाटा



दहावीचा निकाल लागल्याने आता विद्याथीर् आणि पालकांपुढे असलेला प्रश्ान् म्हणजे कुठलं करिअर निवडायचं. ज्या विद्या
र्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नये. कारण ग्लोबलायझेशनमुळे अनेक करिअर नव्याने उदयाला येत आहेत.

खरंतर या प्रश्ानवर विचार करायची ही योग्य वेळ नाही. झाड चांगलं वाढण्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनातच मुलाच्या करिअरचा विचार करायला पाहिजे.

मूल पाचवीत गेल्यानंतर त्याला कुठल्या विषयात रस आहे हे पालकांनी जाणून घ्यावं. दहावी मुलाच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. म्हणून त्याआधी आपला मार्ग निश्चित करणं आवश्यक आहे.

आपल्या देशात १२० विद्यापीठं आहेत. त्यात चार हजारहून जास्त सीनिअर आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत. कमी गुण मिळूनही पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांदे (पू.) इथल्या खेरवाडीमधल्या र्गव्हन्मेण्ट पॉलिटेक्निक कॉलेज हा चांगला पर्याय आहे. बरेच पालक आपली इच्छा मुलांवर लादतात. प्रत्येक पालकाला आपलं मूल इंजिनिअर व्हावं असं वाटत असतं. पण ७० टक्क्यांपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ नये.

तंत्रज्ञान शाखेची आवड असणाऱ्यांसाठी कम्प्युटर हे क्षेत्र चांगलं आहे. या क्षेत्रात उत्तमोत्तम कोसेर्स आहेत. सध्याच्या काळात नोकरीच्या संधी दुमिर्ळ होत असल्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी जॉब ओरिएण्टेड करिअर्सचा विचार करावा. मोबाइल रिपेअरिंगमध्येही चांगलं करिअर होऊ शकतं. याबरोबरीने टीव्ही, फ्रीज रिपेअरिंगचेही कोसेर्स चांगले आहेत. हे कोर्स केल्यावर तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता आणि चांगलं अर्थार्जन करू शकता. तसंच आयटीआयचे टेक्निकल कोसेर्सही करता येतील.

ग्रामीण भागातले किंवा शेतीची आवड असणारे विद्याथीर् शेतीमध्ये करिअर करू शकतात. त्यासाठी आज महाराष्ट्रात चांगली कॉलेजेस आहेत. पर्यावरणाची आवड असलेल्यांनी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घ्यावा. त्यानंतर पाच वर्षं दापोली, राहुटी, परभणी आणि अकोला इथल्या कृषी विद्यापीठात शिक्षण घेता येईल. यात जमिनीची धूप कशी थांबवावी, तिचा कस वाढवणं यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला पर्यावरणाचा एखादा विषय घेऊन रिसर्चही करता येतो.

ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी 'टॅक्सेशन आणि ऑडिट' हे दोन कोर्स उत्तम आहेत. मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 'टॅक्सेशन आणि ऑडिट'चे चांगले कोसेर्स आहेत. हे कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. प्रत्येक व्यवसायात ऑडिटची गरज भासते. त्यामुळे हा कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. याशिवाय हे विद्याथीर् स्वत:चा व्यवसायही करू शकतात. तसंच नोकरी करतानाच इन्कम टॅक्स भरणं, सोसायटी किंवा इतर आस्थापनांची अकाऊण्ट्स लिहिणं यासारखी खासगी कामंही करू शकतात. परंतु ही कामं करताना १२ वी नंतर तुम्हाला तीन वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम नंतर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

ज्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स अशा शाखांमध्ये फारसा रस नाही त्यांच्यासाठी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अशी वेगळी करिअर्सही खुली आहेत. तुमच्याकडे टॅलेण्ट असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रात स्काय इज लिमिट! तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता किंवा चांगल्या बुटिकमध्ये नोकरीही करू शकता. सध्या या क्षेत्रांचे खासगी संस्थांचे सहा ते आठ महिन्यांचे विविध कोसेर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला कापडाचा पोत ओळखणं, स्टिचिंग करणं, विणणं, डिझायनिंग करणं यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. जोडीला तुमची कल्पकता असल्यास या क्षेत्रात उत्तम यश मिळवता येईल.

जेमॉलॉजी हेही चांगलं करिअर म्हणून उदयाला येतंय. प्राचीन काळापासून माणसाला हिऱ्याचं, खड्याचं आकर्षण आहे. त्यामुळे जगभरात अनेक वर्षांर्पासून रत्नांचा व्यापार सुरू आहे. यामध्ये हिऱ्याला पैलू पाडण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि कौशल्याचा भाग असतो. दहावीनंतर या क्षेत्राची आवड असलेले विद्याथीर् हे कोसेर्स करू शकतात. त्याचा कालावधी साधारणत: सहा महिन्यांचा असतो.

ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आवड नाही ते विद्याथीर् जेनेटिक्स किंवा सायकोलॉजी घेऊन एम.एस्सी. करू शकतात. एम.एस्सी. क्लायमेट किंवा पर्यावरण यासारखे वेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला आवड असल्यास बोटीवर खलाशी म्हणूनही जाऊ शकता.

याखेरीज जाहिरात, कला, फोटोग्राफी, डिझायनिंग, कार डिझायनिंग, पत्रकारिता, कलाशाखा, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारखे करिअरचे वेगळे पर्याय आहेतच. ऑल द बेस्ट!

- किरण जोग
(लेखक करिअर कौन्सेलर आहेत)

काय म्हणतायत टॉपर्स?



दहावीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे! आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्
पा ओलांडतानाचा त्यांच्या यशाचा फंडा आणि पुढच्या महत्त्वाकांक्षा, याविषयी त्यांच्याच शब्दांत...

* अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचेय
९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळतील, असे वाटत होतेच परंतु, मुंबईतून पहिला क्रमांक आल्यावर मात्र, आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यशाचे मानकरी शिक्षक, आई-वडील आणि आजी आहे. मला चौथी आणि सातवीची स्कॉलरशीप, होमी भाभा सायन्स टॅलेन्ट हंट स्पधेर्तल्या ज्युनिअर्सच्या गटात सुवर्ण तर सिनिअर्सच्या गटात रौप्यपदक मिळाले आहे. अकरावीसाठी मी ठाण्याच्याच एम. एच. हायस्कूलला प्रवेश घेणार आहे. नंतर आयआयटीला अॅडमिशन घेऊन मला अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचे आहे.
- सोनाली चव्हाण, (९६.४६ टक्के) सरस्वती सेकंडरी, ठाणे, मुंबई विभागातून पहिली

* ध्यास इंजिनीअरिंग, आयएएसचा
दहावीच्या परीक्षेचे टेंन्शन न घेता मी नियोजन करून अभ्यास केला. वर्षभर शाळेतील स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेत खूप मजा केली. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्पेशल बॅचेसमुळे हे यश मिळाले. मला भरतनाट्यमची आवड आहे. मला मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आयआयटीतून इंजिनीअर व्हायचे आहे. नंतर आयएएसही करायचे आहे.
- शेफाली माडदोळकर,(९६.३०) सरस्वती विद्यालय, ठाणे, मुंबई विभागातून दुसरी

* मेडिकलपेक्षा इंजिनीअरिंग आवडते
माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर, तर आई आणि मोठा भाऊ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर त्यामुळे मलाही इंजिनीअर व्हायचे आहे. मला बायोलॉजी विषय आवडत नसल्याने मेडिकलला जाण्यापेक्षा कॉम्प्युटर इंजिनीअर व्हायला आवडेल. माझ्या यशाचे श्रेय शाळेतले शिक्षक, कुटुंबियांना द्यायला हवे. मला अभ्यासात रमायला आवडते, पण चित्रकला, हस्तकलेचेही वेड आहे. सातवीत स्कॉलरशीप मिळाली होती. काही महिन्यांपूवीर् शाळेकडून 'बेस्ट गर्ल' ट्रॉफी मिळाली. मला एम. एच. हायस्कूलला प्रवेश घ्यायचा आहे.
- तेजल प्रधान, (९६.१५) ए. जे. जोशी, ठाणे, मुंबई विभागातून तिसरी

* वेळापत्रक तंतोतंत पाळले
वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेचे ओझे वाटले नाही. वडिलांनी तयार केलेले दिवसभराचे वेळापत्रक, खासगी ट्यूशनमध्ये घेतलेला सततचा सराव आणि शाळेतील शिक्षकांचे मागदर्शन या त्रिसुत्रीमुळे हे यश मिळाले. कंटाळा येऊ नये म्हणून दररोज वेळापत्रक बदलले जात होते. आता पुढे इंजिनीअरिंग करायचे आहे.
- मृण्मयी जाधव, (९६.१५) सुळे गुरूजी विद्यालय,
हिंदू कॉलनी, मुलींमध्ये तिसरी व शाळेत पहिली.

* यश अभ्यासावर ठरते, शाळेवर नाही!
दोन वर्षापूवीर् आम्ही कल्याणहून माहीमला आलो. दादर, माहीम भागांतील एकाही शाळेत प्रवेश न मिळाल्याने रात्रशाळेचा पर्याय निवडला. रात्रशाळेत चांगले शिक्षण मिळत नाही, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शाळा चांगली किंवा वाईट नसते. आपण अभ्यास कसा करतो, यावर बरेच अवलंबून असते. संध्याकाळी सातला शाळा सुटल्यानंतर रात्री थोडा वेळ अभ्यास, पहाटेच्या वेळी तीन तास नियमित अभ्यास, असे माझे अभ्यासाचे वेळापत्रक होते. हायकोर्टात अॅडव्होकेट असलेल्या वडिलांची आणि रात्रशाळेतील शिक्षकांची साथ मिळाल्यामुळेच हे यश मिळवू शकले. मला कम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलमध्ये करिअर करायचे आहे. चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊन आता सीईटी आणि बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंदित करायचे आहे.
- सोनल सिंग, (८४.१५) कनोसा नाईट हायस्कूल, रात्रशाळेत राज्यातून पहिली

* स्वप्न आयआयटी इंजिनीअर होण्याचे
दहावीचा उगाचच बाऊ केला जातो. नियमित अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. अभ्यासातील सातत्य मात्र कमी होऊ न दिल्यास यश तुमचेच आहे. मला वाचनाची आवड आहे. परीक्षेच्या काळात आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. मी सुरुवातीला दोन-तीन तास अभ्यास करायचो, मात्र नंतर हा वेळ वाढवत गेलो व खेळाचा वेळ कमी करीत गेलो. खेळात कधी खंड पडू दिला नाही. मला आयआयटी इंजिनीअर व्हायचे आहे.
- संकेत पाटील, (९६.३०) सेंट अँथनी काँन्व्हेंट, वसई, मुंबई विभागातून दुसरा

* आता आयआयटी, मग आयएएस!
वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे नियोजन केले होते. सुरुवातीला एक दोन तास अभ्यास सुरू होता. मग, पाच-सहा तास आणि नंतर दहा ते बारा तास. क्रिकेट सामने पाहिले, पण टीव्हीमुळे डोळ्यांवर ताण पडू नये म्हणून मालिका आणि मनोरंजाचे सर्व कार्यक्रम बंद होते. मोटारींचे फोटो जमवण्याचा मला छंद आहे. या यशाचे सर्व श्रेय आई वडिल व कोचिंग क्लासला आहे. भविष्यात आयआयटीतून सिव्हिल इंजिनीअरिंग करून पुढे आयएएस व्हायचे आहे. खूप मेहनत करून फोटोतली रोल्सरॉइस फँटम विकत घेण्याचे स्वप्न आहे.
- नवनीत मेहरोल, (९४.६१) सुळे गुरुजी विद्यालय, अपंगांमध्ये पहिला.

* पप्पांचे स्वप्न साकार करायचेय
डोळ्यांत अश्ाू असतील तर पुढचा मार्ग नीट दिसत नाही. त्यामुळे अश्ाू पुसून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंदित करावे, असे पप्पा नेहमी सांगत. दहशतवाद्यांशी लढताना पप्पा शहीद झाल्यानंतर या शिकवणीचे अनुकरण करणे खूप अवघड होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी मी अभ्यासावर लक्ष केंदित केले. दहावीतील हे यश वडिलांच्या त्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आता डॉक्टर होऊन त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे. सांत्वन करण्यासाठी घरी लोकांची सतत ये-जा होती. त्यामुळे शेजाऱ्यांच्या घरी बसून अभ्यास केला. आई आणि बहिणीसोबतच मला शाळेतील शिक्षकांचे पाठबळ मिळाले. हा आनंदाचा क्षण पाहायला पप्पा नाहीत, याची मात्र खंत वाटते.
- निवेदिता शशांक शिंदे, (८६) प्रभादेवी कॉन्व्हेंट र्गल्स हायस्कूल

* अभ्यास-आहाराचे वेळापत्रक सांभाळा
क्लास-शाळा-क्लास आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, असे माझे वेळापत्रक होते. या वेळा सांभाळताना माझे आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष झाल्याने परीक्षा महिन्याभरावर आली असताना सारखी झोप यायची. त्यामुळे अभ्यासात व्यत्यय यायचा. मग मी वेळापत्रक बदललेे. प्रिलिम्समध्ये ९४ टक्के मिळाले तेव्हाच ९५ टक्क्यांच्या पुढे जाण्याचा निश्चय केला होता. या यशात माझ्या खाण्याचे वेळापत्रक पाळणारी आई, अभ्यास करताना माझ्याबरोबर उशिरापर्यंत जागणारे बाबा, धाकटा भाऊ आणि शाळा-क्लासमधील शिक्षकांचा वाटा आहे. मी फक्त अभ्यास एके अभ्यास करायचे, बाकीच्या गोष्टी या सगळ्यांनी सांभाळल्या. शाळेतील एक व्हॉलीबॉलची मॅच सोडली तर मनोरंजनाच्या सगळ्या माध्यमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. जानेवारीत शाळा बंद झाल्यानंतरचा अखंड दिवस क्लास आणि घरी अभ्यास करण्यातच जायचा.
- अंजली जाधव, (९५.८४), अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल,
गोरेगाव, मुंबईत मागासवगीर्यातून प्रथम

congrats " priti ramchandra sutar "

hi friends.....

congrats for all studetnts who success in SSC & HSC exams..... & wish all for best career & future

one good news...

ms. " priti ramchandra sutar " from kardinal pimenta adivasi highschool varkhanda
secure 93.53% in SSC.

this is gr8 news for all..... we can show our ability to world in this way now onwards & we will compete without any limit.

wish her all the best priti for your career & future

jai adivasi shakti!

दहावीनंतर शाखानिवड

या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि 'घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले असतात. यामध्ये विषयाचे आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही

दहावीचा निकाल २५ जूनला लागला आहे. आता विद्यार्थी व पालक या दोघांपुढे एक महत्त्वाचा प्रश्‍न उभा आहे, तो म्हणजे पुढे अभ्यास शाखा कोणती निवडावी? अनेकदा किती गुण मिळालेत यावर हा निर्णय ठरवला जातो. आजही ठोकताळ्याने ७०-७५ टक्‍क्‍यांवर गुण मिळाले, की विज्ञान वाणिज्य कॉमर्स शाखा-त्याच्यापेक्षा कमी गुण मिळाले, की कला शाखा अशा प्रकारे निवडप्रक्रिया होते. यामध्ये बरोबरीचे मित्र/मैत्रिणी कोठे जाणार, हासुद्धा महत्त्वाचा भाग होतो. अनेकदा समाज किंवा पालकांच्या दडपणामुळे ही निर्णय होतो. उदा. एखाद्या ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीने कला किंवा गृहविज्ञान अभ्यासक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला तर तिला वेड्यात काढले जाते आणि इतके चांगले गुण आहेत तर विज्ञान किंवा वाणिज्यला जा, असं दडपण निर्माण केलं जातं. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे, की दहावीला मिळणारे गुण हे बरेचदा अभ्यासपद्धती आणि "घोकमपट्टी' या तत्त्वाने मिळविलेले

mumbai aani marathi





































नवसू वळवी यांना डॉ. हेडगेवार पुरस्कार



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १९८९ मध्ये देशभरात सर्वत्र सेवा निधीचं संकलन करण्यात आले होते. या निधीद्वारे महाराष्ट्रात ६७५ सेवा प्रकल्प पुरस्कृत करण्यात आले आहेत. सेवा कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना या निधीतून डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार देण्यात येतो. या वषीर्चा पुरस्कार देवबांध येथील सह्यादी आदिवासी बहुविध सेवा संघाचे संस्थापक नवसू महादू वळवी यांना दिला जाणार आहे.

वनवासी सेवा आणि वनौषधी संवर्धन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणमधील प्रसिद्ध आकिर्टेक्ट दिलीप दळवी असतील. चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. रामदास मराड यावेळी प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहसंघचालक अनिरुद्ध देशपांडे यांचे मोलाचे विचार ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालून आल्याची माहिती डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधीचे अध्यक्ष बापूराव मोकाशी यांनी दिली.


--

'ती'ची गोष्ट...




मुलगाच मुलीच्या घरी लग्नानंतर मुलगाच मुलीच्या घरी राहायला आला तर? म्हणजे घरजावई म्हणून नव्हे, तर समाजातली- सर्व घरांमधली रीत म्हणून. मुलीचं घर, तिची माणसं, तिचं आयुष्य आहे तसंच पुढे चालू राहणार. किती छान कल्पना वाटते ना?

गंमत म्हणजे ही काही नुसतीच कल्पना नाही तर प्रत्यक्ष तसं घडतंही आहे.

नुकतीच मी 'मेघालय'मध्ये जाऊन आले. नुसते पर्यटक म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित सगळं अनुभवायला नाही मिळणार. पण मला 'जोवाई' या गावामध्ये तिथल्या कुटुंबात राहता आलं. आई- तिची मुलगी आणि मुलीची मुलगी असं एकत्र नांदतं घर मी अनुभवलं.

नवराच लग्नाननंतर मुलीकडे राहायला येतो. तीन-चार बहिणी असतील तर आईच्या घराशेजारी घर बांधून त्या राहतात आणि सर्वांत धाकटी मुलगी तिच्या नवऱ्यासह आई-वडिलांकडेच राहते.

याला मातृसत्ताक पद्धती असं सरसकट म्हणू नका, ही आहे 'मातृवारस' पद्धत. म्हणजे मातृ'सत्ता' नाही पण वारसा मात्र आईकडून मुलीकडे जातो. कुटुंबप्रमुख नवराच असतो पण उत्सव, सण, धार्मिक विधी यामध्ये महत्त्व असतं घरच्या स्त्रीला आणि तिच्या मामाला किंवा भावाला. कसलं छान वाटत होतं त्या कुटुंबात राहताना.

मोठे सण - समारंभ वगळता सासू-सुनेचा संबंधच नाही. सून राहणार आपल्या आईजवळ आणि सासू राहणार तिच्या मुलीजवळ. म्हणजे भांड्याला भांडं लागायचा प्रश्‍नच नाही. भांडण नाही, इगो क्‍लॅश नाही. नवऱ्याची दोन्हीकडून होणारी रस्सीखेच नाही.

या सगळ्यावर कडी करणारी आणखी एक गोष्ट. ती म्हणजे नवरा राहतो बायकोकडे आणि जेवायला मात्र जातो आपल्या आईकडे. म्हणजे नवऱ्यासाठी स्वयंपाक करायचीही भानगड नाही. 'बाई आणि तिची मुलं' हेच नातं केंद्रस्थानी.

आदिवासी कुटुंबामधून आलेली ही परंपरा. पण आज ही कुटुंबं चांगली सुस्थितीमध्ये आहेत.शिकलेली आहेत. आम्ही राहात होतो त्या कुटुंबामधली मुख्य स्त्री कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापक होती. अस्खलित इंग्रजी बोलत होती.

बदलत्या काळानुसार मातृवारस पद्धतीत काही ठिकाणी बदल होत आहेत. पण मेघालयात प्रामुख्याने ही पद्धत टिकून आहे.

मैत्रिणींनो, मग वाटतंय ना की महाराष्ट्रात फुकट इतकी वर्षं काढली म्हणून? की इथे आणायचा ठरवताय मेघालयातला मुलगा लग्न करून?

original at - http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=a24dafcc-b2f8-40f1-98ce-30efba4a908d&SID=742


प्रिय पालक, जरा हेही लक्षात घ्या!

सुट्टी संपली! शाळेच्या कोऱ्या करकरीत वह्या-पुस्तकांचा खास वास जाणवायला लागलाय! नवा वर्ग, नवे मित्र, नवे शिक्षक... सगळ्याची उत्सुकता मुलांना शाळेकडे खेचू पाहाते. पण त्याच वेळेस 'खूप मजा केलीत! उनाडक्‍या केल्यात! आता सगळं बंद! मुकाट अभ्यासाला लागा.' असे फर्मान वेगवेगळ्या सुरात (पण मजकूर सारखाच!) आई-वडिलांकडून सोडलं जातं! आणि शाळा सुरू व्हायच्या आधीच, विनाकारणच शाळेचा - अभ्यासाचा 'ताण' निर्माण होतो.

साऱ्या सुटीभर वेगवेगळे संस्कार वर्ग, छंद वर्ग, कला वर्ग, पोहोणे-स्केटिंग-क्रिकेट असे खेळांचे क्‍लासेस, सहली, ट्रेक असल्या धमाल वेळापत्रकात मनापासून गुंगलेली मुले एकदम टॉप गियरमधून शाळेच्या रिव्हर्स गियर मधे पडतात! 'सुटी म्हणजे आनंद, सुप्त गुणांचा विकास' आणि 'शाळा म्हणजे फक्त अभ्यास आणि जीवघेणी स्पर्धा' अशा दोन हवाबंद कप्प्यात मुलांच्या सुंदर (?) बालपणाचे तुकडे पडतात.'

शाळेतील भाषा, शास्त्र, गणित, तर्क असा बलाढ्य विषयांची हाताळणी, आपल्या मुलांचा डावा मेंदू अगदी फुलस्पीड मधे करीत असतो. (कारण तेच त्याचे काम आहे) परंतु संगीत, चित्रकला, कल्पना, भावना, सामाजिक जाणीवा आणि खासकरून हस्तकौशल्य व सृजनशीलता सांभाळणारा उजवा मेंदू न वापरल्याने चक्क गंजू लागतो. थोडक्‍यात, दोन बैलांच्या गाडीचा एक बैल कामाअभावी सुस्तावतो तर दुसरा बैल प्रचंड कामाने थकून जातो. पर्यायाने मुले थोड्याच वेळात दमतात, मेंदूची कार्यप्रणाली मंद होते. एकाग्रता कमी होते. अस्थिरता व चिडचिड निर्माण होते!

खरं तर हस्तकला, चित्रकला, प्रयोग, निसर्ग निरीक्षण, छोटे मोठे ट्रेक, भ्रमंती, गप्पा-गाणी-गोष्टी, नाटक, नृत्य हे संगळं फक्त सुटीपुरते मर्यादित न राहाता, शिबिर-संस्कारवर्ग असल्या चौकटीत न अडकता, रोजच्या शाळेबरोबरच चालू राहिले पाहिजेत. हे सगळे उजव्या मेंदूचे उपक्रम शाळेतील अभ्यासाच्या ताणाला एक झकास "उतारा' मिळवून देतात. संगणकाच्या भाषेत 'ड्युएल प्रोसेसर' मेंदू जास्त जोमाने, न थकता काम करू शकतो. आपण सर्वजण दर आठवड्याला रविवारची (काही ठिकाणी शनिवार सुद्धा) हक्‍लाची सुट्टी घेतो. मग केवळ शरीरालाच नव्हे तर आपल्या मेंदूलाही ती का नको?

पण ही हक्काची सुट्टी बहुतेक मुले टाइमपास करण्यात घालवतात. त्यात अर्थात टी. व्ही. आणि संगणक (पुन्हा डाव्या मेंदूचेच काम) मुख्य वेळ खातात. उरलेला वेळ उगाच भटकण्यात व हॉटेलिंग करण्यात जातो. जरा जागरुक पालक असले, तर मुलांना क्‍लासेस मधे अडकविण्यात येते. परंतु मुलाने स्वतःहून काही केले आहे. नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत हे घडतच नाही. मग "चमच्याने भरवले' तरच खायची सवय लागते. हे टाळण्यासाठी, मुलांना शेजारी बसवून वेगवेगळी कौशल्ये शिकवावी लागतात. कारण कौशल्य नसेल तर निव्वळ माहितीचा विशेष उपयोग होत नसतो. कौशल्य असेल तर मग त्यात शास्त्रीय संकल्पना आणि कलात्मक सृजनशीलता एका मेळाने येतात. ही प्रक्रिया केवळ सुटीपुरती मर्यादित नसून निरंतर असायला हवी.

ही निरंतर प्रक्रिया वर्षभर चालू ठेवण्याचे काम गेली वीस वर्षे श्री. माधव खरे आणि सौ. सुनीता खरे शास्त्रवाहिनीच्या माध्यमातून करत आहेत. हस्तकौशल्ये आणि मूलभूत शास्त्रीय माहितीचा एकत्रित वापर करून (थोडक्‍यात, उजव्या व डाव्या मेंदूचा एकत्र वापर) सुंदर व उपयुक्त प्रकल्प निर्माण करण्याचे तंत्र शास्त्रवाहिनी मुलांपर्यंत सहजपणे पोहोचविते. त्यातून मुलांचा आत्मविश्‍वास तर वाढतोच पण त्यांच्यात स्वयंशिक्षणाची आवड निर्माण होते हे विशेष महत्त्वाचे!

- डॉ. सुनील सुरेश गोडबोले

shastravahini@rediffmail.com

(डॉ. गोडबोले पुण्यातील बालरोगतज्ज्ञ आहेत. बालमानसशास्त्रावर त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. 'आई मी काय खाऊ...?', 'पोरी जरा जपून', 'बालपण फुलवताना' ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.)

आणि मी डॉक्टर झाले

आपल्या आयुष्यात करिअर आणि शिक्षण यांचा संबंध असतो. अनेक जण शिक्षण घेतात, शाळा, कॉलेजच्या प्रगतीपुस्तकात ते चमक
तात. करिअर करताना मात्र वेगळ्याच वाटेने जातात. तिथेही स्वत:च स्थान निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला किती महत्त्व आहे, हे सांगणारा कॉलम 'मेरिट लिस्ट'.

.......

निशिगंधा वाड अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे. बारावीत मेरिट लिस्टमधे आलेल्या निशिगंधाने पीएचडी पूर्ण केली आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, याविषयी सांगतेय स्वत: निशिगंधा वाड.

....

कामाचे व्याप, एकामागोमाग आलेल्या जबाबदाऱ्या, त्यातून मिळणारे असंख्य अनुभव... हे सगळं अनुभवत असताना आयुष्याला नकळत वेगाची सवय होऊन गेली. आपल्याच पाऊलखुणा कधी मागे पडल्या ते कळलंही नाही.

मी डॉक्टर निशिगंधा वाड, अशी ओळख करून देताना आज खरंच खूप बरं वाटतं. कारण आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आव्हानं स्वीकारण्यातला आणि ती पूर्ण करण्यातला आनंद काय असतो ते पदवीने मला शिकवलं. खरं म्हणजे मी आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरावले होते. संसार, करिअर या महत्त्वाच्या टप्प्यांनी लय पकडली होती. पण तरीही मला डॉक्टरेट मिळवायचीच होती.

आमच्या घरावर सरस्वतीचा पहिल्यापासूनच वरदहस्त. माझी आई शिक्षिका, थोरली बहीण प्राजक्ता अतिशय आदर्श विद्याथीर्नी. प्रचंड बुद्धिमान, गुणी... पण मी घरातलं आगाऊ शेंडेफळ म्हणून ओळखले जायचे. शाळेत असताना जरी वर्गात वरचा नंबर येत असला तरी नाटक आणि अभ्यास असा डोलारा मी सावरत असायचे. आमचे सगळेच नातेवाईक उच्चशिक्षित. माझा कलाक्षेत्राकडचा ओघ पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. पण प्रत्येकवेळी माझी आई खंबीरपणे माझ्यामागे उभी राहिली.

घरच्यांनी मला पाठिंबा तर दिलाच पण माझ्या अभ्यासात कुठेही खंड पडणार नाही ना याची काळजीही घेतली. त्यांच्या या पाठबळामुळे दहावीत पहिल्या पन्नासात माझं नाव झळकलं. रिझल्टच्या दिवशी मी दिनानाथ नाट्यगृहात 'मोरूची मावशी'चा प्रयोग करत होते. रिझल्टची बातमी आली तेव्हा सगळ्या कलाकारांनी मला पेन, कम्पासपेटी, गोष्टीचं पुस्तक अशा भेटी देऊन आनंद साजरा केला होता. त्या छोट्या सोहळ्याचा आनंद आजही तसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा आहे.

८७ मधे मी बारावी झाले. मी रूपारेल कॉलेजमधे आर्ट्सला शिकत होते. अभिनयक्षेत्रातला माझा ओढा पाहून प्रिन्सिपल प्रधान मला शक्य तितकी मदत करायचे. मी तिसरा भाषा विषय म्हणून हौसेने जर्मन घेतलं होतं. पण ट्युशन्ससाठी वेळ नव्हता. मुलुंड ते दादर दरम्यान लोकल प्रवासात जर्मन विषयाची डिक्शनरी पाठ करायची सवय लावून घेतली. त्या बळावर पेपर्स लिहिले. बारावीत मी मेरीटमधे तिसरी आले तेव्हा माझ्यापेक्षा शिक्षक आणि घरातल्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्यांच्या आनंदानेच मला शिक्षणातल्या पुढच्या टप्प्याचे वेध लावले आणि बाहेरच्या जगाचा अनुभव घेत असताना शिक्षणाबद्दलची ओढही उत्तरोत्तर वाढत गेली.

ग्रॅज्युएशननंतर रुईयातून थिसीस लिहित होते. याचवेळी माझ्या मुलीचा जन्म झाला. आयुष्यातल्या या नव्या पर्वामुळे माझ्या शिक्षणात खंड येणार या गोष्टीने मी अस्वस्थ झाले. त्यावेळी माझ्या गाईड, घरचे खंबीरपणे माझ्यामागे उभे राहिले. मीही पुन्हा निश्चय केला आणि या मेहनतीचं फळ मिळालं. वाड घराण्याची शेंडेफळ निशिगंधा, डॉक्टर निशिगंधा वाड झाले.

कलाक्षेत्रात करिअर करूनही डॉक्टरेट मिळवायची ओढ किंवा आज जे काही कमावलंय त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना जातं. परमेश्वरांनी आपल्याला जे दिलंय त्यात स्वत:च्या मेहनतीने आपण अठरा टक्क्यांनी वाढ करू शकतो. पण आईवडिल यांचे संस्कार आयुष्याला शंभर टक्के आकार देतात, हे मी अनुभवातून सांगतेय.

माझ्या आईचं एक वाक्य आहे, संस्कृतीची पाळंमुळं घट्ट रुजली असली की कुठल्याही आकाशात आपल्या पंखांचं बळ आजमवायचं भय नको.... बालपणापासून ते आजच्या या क्षणापर्यंत हे पाठबळ माझ्यासोबत आहे.

इण्टरव्ह्यूला जाताना...



नोकरीसाठी इण्टरव्ह्यू देण्याची वेळ प्रत्येकावर केव्हा ना केव्हा येतेच. काहींना पहिल्या फटक्यातच नोकरी मिळते, त
र काहींना असे अनेक इण्टरव्ह्यू द्यावे लागतात. इण्टरव्ह्यू देण्याची कितवीही वेळ असली, तरी प्रत्येकाने काही गोष्टी हमखास लक्षात ठेवायला हव्यात.

.......

* तुम्हाला दिलेल्या इण्टरव्ह्यूच्या वेळेच्या किमान दहा मिनिटं आधी उपस्थित रहा. इण्टरव्ह्यूला उशीरा पोहोचणं, तुमचं इम्प्रेशन बिघडवू शकतं.

* आपली बॉडी लँग्वेज सकारात्मक राहील, याची काळजी घ्या. समोरच्याच्या डोळ्याला डोळे भिडवून आत्मविश्वासाने बोला. समोरच्या व्यक्तीची नजर कधीही चुकवू नये, असं केल्यास तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. चेहऱ्यावर हलकं स्माइल ठेवायला हवं

* आपले कपडे योग्य ठेवा. नखं कापलेली व्यवस्थित असू दे. बूटांना पॉलिश असेल याची काळजी घ्या. केस नीट विंचरायला हवेत.

* काही वेळेस टेलिफोन इण्टरव्ह्यू घेऊन योग्य उमेदवाराची प्राथमिक किंवा अंतिम निवड केली जाते. ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. म्हणूनच अर्ज केल्यापासून अशा इण्टरव्ह्यूसाठी तयार रहा.

* पॅनल इण्टरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीबरोबरच इतरांकडेही लक्ष द्यायला हवं.

* भडक मेकअप करू नका. भरपूर दागिने किंवा उग्र परफ्यूम लावू नका.

* आपला इण्टरव्ह्यू नक्की कोणत्या पदासाठी आहे, त्या पदाच्या जबाबदाऱ्या आणि आवश्यक क्षमता, स्किल्स यांची माहिती आधीच जाणून घ्यायला हवी.

* बऱ्याच जणांना इण्टरव्ह्यू म्हणताच टेन्शन येतं. पण हे टेन्शन चेहऱ्यावर दिसणार नाही, याची काळजी घ्या.

* कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. समोरच्या व्यक्तीशी योग्य प्रकारे संवाद साधायला हवा. अती बोलणं किंवा कमी बोलणं, असं करू नका.

* इण्टरव्ह्यू तुमचा असला, तरी इण्टरव्ह्यूच्या शेवटी तुम्हीही काही प्रश्न इण्टरव्ह्यू घेणाऱ्यांना विचारू शकता. इण्टरव्ह्यू घेणाऱ्यांनी तुम्हाला काही प्रश्न आहेत, का असं विचारताच 'हो' उत्तर देणं तुमचा त्या कंपनी, कामाबद्दलचा इण्टरेस्ट दाखवून देतो. पण हे प्रश्न विचारताना काळजी घ्या. इण्टरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तींचं पद (पोझिशन) लक्षात घेऊन त्यांना प्रश्न विचारा. कंपनी कल्चर, आपल्या क्षमता आणि आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा तसंच इण्टरव्ह्यू प्रक्रिया याबद्दल तुम्ही विचारू शकता.

* इण्टरव्ह्यूला जाण्यापूवीर् सिगारेट ओढू नका किंवा च्युईंगम चघळू नका.

* आपला आवाज सगळ्यांपर्यंत नीटपणे पोहचेल, याची काळजी घ्या.

* शेकहॅण्ड करताना तुमच्या व्यक्तिमत्त्वातील ठामपणा, आत्मविश्वास दिसून येऊ दे.

* आपण कोणत्या कंपनीत इण्टरव्ह्यूला जात आहोत, त्या कंपनीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असायला हवी.

* इण्टरव्ह्यूला जाताना सटिफिर्केट्स सादर करावी लागतात. अशा वेळी कधीही बनावट सटिफिर्केट्स सादर करू नका.

* आपल्या आधीच्या/ सध्याच्या कंपनी किंवा मालकाबद्दल वाईट बोलू नका.

* काही वेेळेस ग्रुप इण्टरव्ह्यूमधून एखाद्याची निवड केली जाते. तुम्ही अशा इण्टरव्ह्यूला सामोरं जात असाल, तर तुम्ही इतरांहून वेगळे आणि स्मार्ट आहात हे दाखवून द्यायला हवं. त्याचबरोबर आपण टीममध्ये व्यवस्थितपणे काम करू शकतो, हे दाखवून द्यायला विसरू नका.

* मोबाइल आज हमखास सगळ्यांकडे असतो. पण इण्टरव्ह्यूच्या वेळेस आपला मोबाइल बंद किंवा सायलेण्ट मोडवर ठेवायला विसरू नका.

- प्रगती फास्ट टीम

चाकोरीबाहेरची शाळा



भाईंदरजवळ उत्तनच्या निसर्गरम्य परिसरात 'केशवसृष्टी' वसली आहे. केशवसृष्टीच्या विविध उपक्रमांपैकी रामरत्ना विद्य
ा मंदिर एक आहे. अभ्यासाबरोबर मुलाचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी आवश्यक असणारे उपक्रम शाळेत आहेत.

बरेच पालक आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे सर्वांच्याच घरात आजी-आजोबा असतीलच असं नाही. ती जबाबदारी आजच्या रेसिडेन्शियल स्कूल्सनी उचलली आहे. रेसिडेन्शियल स्कूलची संकल्पना नवीन नाही. फक्त आजच्या काळात त्याची गरज जास्त आहे. बोडिर्ंग स्कूलसारखीच ही रेसिडेन्शियल स्कूल्स असतात. बोडिर्ंग स्कूल्स हिल स्टेशनवर, घरापासून लांब असायची. परंतु रेसिडेन्शिअल स्कूल मंुबईतल्या ताणतणावांनी भरलेल्या वातावरणापासून दूर, निसर्गरम्य ठिकाणी असली तरी शहरापासून खूप लांब नाहीत.

रामरत्ना विद्या मंदिरविषयी मुख्याध्यापिका अनिता साहू यांनी अधिक माहिती दिली, 'मुलं मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. आपण संस्कार देऊ तशी ती घडतात. ही जबाबदारी पालकांबरोबर शाळेची आणि शाळेल्या शिक्षकांची असते. रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलं शाळेतच राहत असल्यामुळे जबाबदारी जास्त असते. शिक्षकांनाच दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. आपल्या देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावी याचा विचार करूनच अभ्यासाबरोबर इथली दिनचर्या आखली जाते. अभ्यासाबरोबर आम्ही मुलाच्या मनात देशप्रेमही जागृत करतो. शाळेला यंदा बारा वर्षं पूर्ण झाली. आमच्या पहिल्या बॅचचा विद्याथीर् परदेशात उच्चशिक्षण घेऊन भारतात परतला आहे.'

शाळेचा परिसर तीस एकरमध्ये पसरला असून त्यात शाळा, हॉस्टेल, स्वीमिंग पूल, मेस, सात बेडचं हॉस्पिटल आणि मैदान आहे. शाळा चौथी ते बारावीपर्यंत आहे. शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम आहेत. शाळेने गुरूशिष्य परंपरा जपली आहे. मुलांवर वैयक्तिक लक्ष ठेवता यावं यासाठी दहा मुलांमागे एक शिक्षक नेमला आहे.

सकाळी साडेपाच वाजता मुलांचा दिवस सुरू होतो. सकाळच्या प्रार्थनेत मुलांना स्तोत्रं शिकवली जातात. त्यानंतर योगासनं होतात. व्यायामानंतर आंघोळ करून, ब्रेकफास्ट घेऊन मुलं शाळेसाठी तयार होतात.

रोज संध्याकाळी खेळासाठी अर्धा तास राखून ठेवला जातो. या तासामध्ये मुलांना स्वीमिंग, कराटे, बास्केट बॉल असे बारा खेळ शिकवले जातात. शाळा संपल्यावरही मैदानी खेळासाठी एक तास राखीव ठेवला जातो. रात्रीच्या जेवणानंतर मुलांसाठी संस्कार वर्ग असतो. त्यानंतर अभ्यास, वर्तमानपत्र वाचन आणि टीव्ही पाहण्यासाठी एक तास असतो. स्वत:चे बूट पॉलिश करणं, दुसऱ्या दिवशीची तयारी तसंच आपलं कपाट व्यवस्थित आणि नीटनेटकं ठेवणं यातून मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात. रात्री दहाला मुलांचा दिवस संपतो. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी जातात. शाळेला गुरुवारी सुट्टी असते. महिन्यातून एका रविवारी पालकांची मीटिंग असते.

शिक्षकांनाही खास प्रशिक्षण दिलं जातं. शाळेचे चेअरमन महेंदा काबरा आणि व्हाइस चेअरमन अरविंद रेगे हे प्रशिक्षण देतात. अभ्यासामध्ये कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांची वर्षभरामध्ये प्रगती होऊन ते साठ आणि सत्तर टक्क्यांपर्यंत ते मार्क मिळवतात. गेली पाच वर्षं शाळेला 'बेस्ट स्कूल'चं पारितोषिक मिळालं आहे.

- प्रतिनिधी

परिपूर्ण शाळा


:
- कविता कर्वे
प्रिन्सिपॉल, आयएफएफएस
बिलबाँग हाय स्कूल,
ठाणेच्या माजी प्रिन्सिपॉल


पूर्वी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला जाणारी मुलं ठराविक वर्गातली असायची. आज रेसिडेन्शियल आणि डे-स्कूल्सची मागणी वाढत आहे. शाळेत मुलाच्या अभ्यासाबरोबरीने त्याची आवड लक्षात घेऊन त्यानुसार त्याला एखादी कला किंवा खेळ शिकवले जातात. रेसिडेन्शिल स्कूलची संकल्पना बोर्डिंग स्कूलवर आधारित असली तरी दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. रेसिडेन्शियल स्कूल शहराच्या धकाधकीपासून दूर असली तरी शहरापासून लांब नसतात. कर्जतमध्ये 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' हे असंच एक रेसिडेन्शियल स्कूल सुरू होत आहे.
.......

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, Values are not taught but caught. जीवनमूल्यं ही शिकवता येत नाही, ती आत्मसात करावी लागतात. ही म्हण खरी असली तरी पूर्णसत्य नाही. जीवनमूल्यं शिकवता येत नाही ही गोष्ट खरी आहे पण जीवनमूल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र शिकवावा लागतो. मूल जन्माला येतं त्यावेळी त्याला भल्याबुऱ्याची जाण नसते. चांगल्या-वाईट गोष्टी शिकवण्याचं काम हे आई-वडिल आणि गुरुजनांचं असतं.

कर्जतमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' या रेसिडेन्शियल स्कूलचा मुख्य उद्देशच मुलांना व्यापक दृष्टिकोन देण्याचा आहे. यामुळे त्यांच्या शाळेचं घोषवाक्यच 'वसुधैव कुटंुबकम्' असं आहे. याचाच अर्थ संपूर्ण विश्व आपल्या कुटुंबाप्रमाणे असून त्याच्या हिताचाच विचार आपल्याकडून व्हायला हवा. शाळेबद्दलची अधिकाधिक माहिती पालकांना मिळावी यासाठी ठिकठिकाणी सेमिनार्सचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती खाली दिली आहे.

'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' या शाळेच्या उभारणीमध्ये भानुशाली कुटंुबाचं फार मोठं योगदान आहे. शाळेचे मॅनेजिंग ट्रस्टी पी. सुब्रमण्यम यांचाही शाळेच्या उभारणीमध्ये मोठा सहभाग आहे.

शाळेची उद्दिष्ट्य :
आजचे पालक करिअर ओरिएण्टेड असल्यामुळे त्यांच्याकडे आपल्या मुलाला देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांचा प्रश्ान् सतत त्यांना भेडसावत असतो. करिअर करताना त्यांचं अर्धं लक्ष शाळा आणि पाळणाघरात असणाऱ्या मुलाकडे असते. मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार वाढत असल्याने मुलांविषयी त्यांना सतत काळजी वाटत असते. म्हणूनच आजच्या पालकांसाठी रेसिडेन्शियल स्कूल्स फायदेशीर ठरत आहेत.

या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रमाचा शिकवला जातो. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असते. या शाळेमध्ये अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्वांगिण विकासावरही भर दिला जातो. मुलाच्या आवडीची कला, खेळ यामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जातं. यामध्ये मुलाची आवड लक्षात घेतली जाते. इथे मूल स्वावलंबी होतं. तसंच त्याच्यामधले नेतृत्त्वगुण वाढीला लागतात.

शाळेची वैशिष्ट्य:
इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन ही शाळा 'को-एडेड' आहे. या शाळेत आयसीएसई अभ्यासक्रम प्रस्तावित आहे. मुलांच्या मनात परीक्षेची भीती निर्माण होऊ नये म्हणून प्राथमिक वर्गांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी मुलांची नियमित चाचणी केली जाईल. त्याविषयीचं दडपण मुलांना येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

शाळेमध्ये मुलांना शिकवली जाणारी जीवनमूल्यं,

० जगा आणि जगू द्या.
० आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांशी सलोख्याने वागा.
० एकजुटीने राहा.
० प्रेम, सत्य आणि सहिष्णुतेचं महत्त्व जाणा.

शाळेचं वेगळेपण :
रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलं शिस्तबद्ध, स्वावलंबी होतात. पण बरेचदा हे गुण त्यांना कुटुंबापासून दूर नेतात. इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन मात्र मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये दुवा बनण्याचं काम करेल. मुलामध्ये घरची ओढ टिकून राहण्यासाठी महिन्यातून एकदा मुलाला पालकांसोबत शेवटच्या शुक्रवारी संध्याकाळी घरी जाता येईल. आज विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांना आजी-आजोबांची माया मिळत नाही. इंडिया र्फस्ट फाऊण्डेशनने आपल्या आठवड्याच्या कार्यक्रमांमध्ये खास आजी-आजोबांसाठी तास राखून ठेवला आहे.

वर्गातल्या एका मुलाच्या आजीआजोबांना आठ ते दहा दिवस शाळेत राहता येईल. त्या दिवशी आजीआजोबा आपल्या नातवंडासोबत तसंच त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत एक दिवस घालवतील. त्यांना गोष्टी सांगतील. गाणी, स्तोत्रं शिकवतील. आजी-आजोबांना इथे फक्त येण्याचा खर्च करावा लागेल. त्यांच्या राहण्याचा, जेवण्याखाण्याचा खर्च करावा लागणार नाही.

मुलांना देशातल्या तसंच परदेशातल्या कला शिकवण्यासाठी 'ग्लोबल व्हिलेज' उभारण्यात आलं आहे. मेडिटेशन, योग शिकण्यासाठी खास सेण्टर उभारलं आहे. विश्वातल्या प्रत्येक देशातल्या मान्यवरांविषयी माहिती देण्यासाठी 'हॉल ऑफ फेम'ची योजना करण्यात आली आहे. याशिवाय मुलांसाठी अद्ययावत सोयींनी सुसज्ज असं हॉस्टेलही बांधण्यात आलं आहे.

प्रत्येक मूल हे खास असतं. त्याची स्वत:ची ओळख असते. मुलामधली निरागसता न घालवता त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडवण्याचा वसा इंडिया र्फस्ट फाऊण्डेशनने घेतला आहे. मुलामध्ये 'ए' अॅम्बिशनचा, 'बी' ब्रेव्हरीचा आणि 'सी' कॉन्फिडन्सचा रुजवण्यात शाळेला यश येईल हे मात्र निश्चित.

- कुमुद इतराज

सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व



शिक्षण पूर्ण झालं, की नोकरी मिळवण्याची खटपट सुरू होते. नोकरी मिळवण्याच्या या अग्नीपरीक्षेत हल्ली एज्युकेशन क्व
ॉलिफिकेेशनबरोबरच तुमची पर्सनॅलिटी, सॉफ्ट स्किल्सही तपासली जातात. म्हणूनच शिक्षणाबरोबरच आपलं एकंदर व्यक्तिमत्व विकसित करायला हवं. व्यक्तिमत्व विकसित करतानाच सॉफ्ट स्किल्सही अंगी बाणवायला हवीत. यात कम्युनिकेशन स्किल, लिसनिंग, मॅनर्स/ एटिकेट्स, नेगोशिएट, लँग्वेज, सौजन्य, टीम स्पिरीट, या महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्सचा समावेश होतो. आजच्या प्राफेशनल लाइफमध्ये यशस्वी होण्यासाठी ही सॉफ्ट स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.

आता, तुम्ही म्हणाल हे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप कसे करणार? म्हटलं तर तसं सोपं आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर सहकाऱ्यांना गुडमॉनिर्ंग म्हणत ग्रीट करायला विसरू नका. दुसऱ्यांच्या कामाचं कौतुक करा. इतरांशी बोलताना बॉडी लँग्वेज सकारात्मक असू दे. तसंच आवाज, आणि भावनांवर कण्ट्रोल ठेवा. ऑफिसमध्ये आपलं आऊटफिट नीट असू दे. दुसऱ्यांना नकार देताना त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये काम करणं म्हणजे टीमवर्क आलंच. सहकाऱ्यांना घेऊन एकत्र काम करण्याचा आणि लीडरशिप स्किल्स तुम्हाला यश मिळवून देतील. संवाद एकतफीर् होणार नाही हे लक्षात ठेवा.

- प्रगती फास्ट टीम

मुलांना करिअर निवडायची पूर्ण मुभा द्या


कौन्सेलिंग सायकोलिजिस्ट मुग्धा बवरेंचा सल्ला


'मुलांच्या करिअर प्लानिंगमध्ये पालकांचा सहभाग जरूर असावा, परंतु त्यांनी मुलांना त्यांच्या आवडीचं करिअर निवडण्याची मुभा दिली पाहिजे. पालकांचा सहभाग असावा, परंतु आग्रह असू नये,' असं मत कौन्सेलिंग सायकोलिजिस्ट मुग्धा बवरे यांनी व्यक्तकेलं. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'गोल्स'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या करिअर कौन्सेलिंग सेमिनारमध्ये त्या पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. दहावी-बारावीच्या परीक्षांनंतर करिअरच्या मळलेल्या वाटा निवडण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी नवनवीन करिअर ऑप्शन्सचा विचार करून आपलं भविष्य उज्ज्वल बनवावं, असा सल्लाही त्यांनी दिला. करिअर निवडताना त्या विषयात केवळ रस असणं आवश्यक नाहीए तर आपल्यात तेवढी किमान पात्रता आहे का, हेही तपासावं, असंही त्या पुढे म्हणाल्या.

मुलासाठी कोणतं करिअर निवडायचं यासाठी करिअर कौन्सिलरची मदत घेणं पूर्वी कमीपणाचं मानलं जाई. कारण त्यासाठी एका 'सायकोलिजिस्ट'कडे जावं लागतं. परंतु आता हे चित्र बदलत आहे. दहा वर्षांपूर्वी आपण जेव्हा करिअर कौन्सेलिंग चालू केलं तेव्हा करिअर मार्गदर्शनसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र आता तसं नाहीए, असं मुग्धा बवरे म्हणाल्या. अनेकजण करिअरसंदर्भातल्या मार्गदर्शनसाठी वेबसाइट्स शोधत राहतात. परंतु वेबसाइट्सवरची माहिती विश्वसनीय असतेच असं नाही. त्यातले बरेचे कोसेर्स कालबाह्य झाले असल्याची शक्यता असते. म्हणूनच भरपूर डेटाबेस आणि नवनवीन कोसेर्सची माहिती असणाऱ्या करिअर कौन्सेलरकडे जाणं कधीही उत्तम, यावर बवरे यांनी भर दिला. करिअर कौन्सेलर विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन करतात तसंच त्यांचे विचार पूर्वग्रहदूषित नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य आणि अचूक माहिती मिळते, असंही त्या म्हणाल्या.

करिअर गायडन्स नेमकं कधी चालू करावं, या महत्त्वाच्या प्रश्नावरही बवरे यांनी प्रकाश टाकला. मूल नववीत असताना त्याने दहावीपुढल्या करिअरचा विचार सुरू करावा. दहावीचे मार्क्स कळल्यानंतर करिअरचा विचार करण्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. कौन्सेलर अॅप्टिट्युड टेस्टच्या मदतीने विद्यार्थ्याचा कल कोणत्या विषयाकडे आहे याची चाचपणी करतात. काही पालक आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांवर करिअर लादतात, ते योग्य नाही. त्यापेक्षा आपल्या मुलाचा कल आणि क्षमता यांचा विचार करून त्याला योग्य करिअर निवडण्यास मदत करावी, असा सल्ला बवरे यांनी दिला.

खूप चांगले मार्क्स मिळाले तर सायन्सला, त्याहून कमी मार्क्स मिळाले तर कॉमर्सला आणि त्याहून कमी मार्क्स असतील तर आर्ट्सला प्रवेश घ्यायचा, ही वृत्ती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वसाधारणपणे दिसते. परंतु आता प्रत्येक शाखेमध्ये उत्तमोत्तम कोसेर्स उपलब्ध असल्याने हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे, यावर बवरे यांनी भर दिला. खासगी संस्थेतून एखादा कोर्स करण्यापूवीर् ती संस्था ऑथराइज्ड आहे की नाही याची पालक आणि विद्यार्थ्यांनी चौकशी करणं आवश्यक आहे. त्यानंतर बवरे यांनी सायन्स, कॉर्मस आणि सायन्स या तिन्ही शाखांमधल्या विविध करिअर ऑप्शनची सविस्तर माहिती दिली.

बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुलातल्या ज्ञानविहार लायब्ररीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सेमिनारला पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.

प्रगती फास्ट टीम

बेटर ऑप्शन फॉर बेटर जॉब!



बारावीनंतर टिपिकल बीएसस्सी, बीकॉम, बीए होण्यापेक्षा नोकऱ्यांचे दरवाजे उघडणाऱ्या प्रोफेशनल डिग्री कोसेर्सवर मुल
ांच्या उड्या पडताहेत.

बारावी झाली, की डॉक्टर, इंजीनिअर्स सोडले, तर प्रत्येकाचे वेध ग्रॅज्युएशन करण्याकडे लागतात. पण गेल्या काही वर्षांत टिपिकल बीएस्सी, बीकॉम, बीएसाठीची गदीर् ओसरत चालली आहे. कारण प्रोफेशनल डिग्री ऑप्शन्स पॉप्युलर होऊ लागलेत. मुंबई युनिव्हसिर्टीचे हे डिग्री कोसेर्स बहुतेक मोठ्या कॉलेजांमध्ये सुरू आहेत. माकेर्टची गरज लक्षात घेऊन हे कोर्स बनवले जातात. त्यामुळे थेट रोजगार देणारे हे कोर्स नवा ट्रेण्ड घडवत आहेत. त्यामुळेच शहरातल्या सगळ्या महत्त्वाच्या कॉलेजांमध्ये नेहमीच्या डिग्रींपेक्षा प्रोफेशनल डिग्रींची कट ऑफ लिस्ट जास्त मार्कांना लागते.

बीएसस्सी इन अॅनिमेशन
सध्या अॅनिमेशनची चलती आहे आणि त्याचबरोबर अॅनिमेशनमधल्या बीएसस्सीचीही. एण्टरटेन्मेण्ट इण्डस्ट्री वाढतेय. अनेक मोठे कॉपोर्रेट्स आणि हॉलिवूडचे निर्मातेही भारतात प्रॉडक्शन हाऊस सुरू करतायत. त्यामुळे नेहमीचे अॅनिमेशनचे छोटेमोठे कोर्स करण्यापेक्षा याला प्राधान्य दिलं जातंय.

बीएमएस : बॅचलर ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट आणि एमबीएवाल्यांचं ग्लॅमर आता आपल्या आजूबाजूच्या कॉलेजांमधल्या बीएमएसलाही आलंय. मिठिबाईसारख्या कॉलेजांत तर कम्प्युटर सायन्सपेक्षाही बीएमएसला जास्त मागणी आहे.

बीएमएम : बॅचलर ऑफ मास मीडिया
मीडिया क्षेत्रात प्रचंड ग्लॅमर आहे आणि लोकांशी बांधिलकीही. हा कोर्स असलेल्या कॉलेजांकडे मुलांचा ओढा आहे. बीएमएम आणि बीएमएसचे कोर्स मुंबई विद्यापीठाने २००१ पासूनच सुरू केलेत. हा कोर्स केल्यानंतर जर्नलिझम, अॅडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन्स, कापोर्रेट्स, अशा अनेक ठिकाणी ही मुलं चिकटतायत.

बीएस्सी इन आयटी

बीएस्सी इन कम्प्युटर सायन्स

बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी

कम्प्युटर, इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी ही नव्या जगाची टेक्नॉलॉजी आहे. त्याचं मोठं माकेर्टही आहे. देशात आणि परदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या यात आहेत. रेग्युलर कोसेर्सपेक्षा हे कोर्स खूप महत्त्वाचे आणि करिअरला आकार देणारे आहेत.

बीएफएम : बीकॉम इन फायनान्शिअल माकेर्ट

बीबीआय : बीकॉम इन बँकिंग अॅण्ड इन्शोरन्स

बीएएफ : बीकॉम इन अकौण्टन्सी अॅण्ड फायनान्स

रेसेशन असो की तेजी फायनान्शिअल सेक्टरमधल्या करिअरचा शेअर वधारतोच आहे. एकूण आथिर्क व्यवहारात मुलांना तरबेज करणाऱ्या या कोर्सना मोठा प्रतिसाद आहे. या कोर्सशी खूप मोठी इण्डस्ट्री अॅटॅच असते. त्यामुळे यात ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना लगेचच मन्थली २० हजारपासून जॉब मिळतो. पण, बीकॉमनंतर ही ऑफर तीन हजारांपासूनही असू शकते. यावषीर्पासून जयहिंदसारखं कॉलेजही बीएएफ आणि बीएफएमचे कोर्स सुरू करतंय.

प्रगती फास्ट करिअर फास्ट




बारावीचा रिझल्ट लागून आता अॅडमिशनची धांदल उडालीय. मिळालेल्या मार्क्सवर फॅकल्टी निवडण्याची धावाधाव सुरू आहे. पण, मार्केटमध्ये कोणत्या करिअर्सची चलती आहे, हे कुणीतरी सांगायला हवं. आपल्या आवडत्या फिल्डमध्ये किती संधी आहेत हेही मुलांना ठाऊक नसतं. इतकंच नव्हे, तर करिअर निवडताना कोणते निकष ठरवावेत हेही समजून घेतलं जात नाही. हे टळावं म्हणून 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी दोन ते पाच या तीन तासांमध्ये एक्स्पर्ट्स खूप नवी दालनं खुली करणार आहेत.

चर्चगेटच्या गव्हन्मेंण्ट लॉ कॉलेजमध्ये एक्पर्ट्सचं मार्गदर्शन आणि त्यांच्याशी चर्चा असा का कार्यक्रम असेल. गव्हन्मेंट लॉ कॉलेज अॅल्युम्नाय असोसिएशनचं सहकार्य या कार्यक्रमाला मिळालंय. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य असेल.

करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे

आपण मध्यमवर्गीय मराठी मुलं आणि पालक करिअर निवडताना नेमके कुठे अडखळतो. आपल्या सामाजिक आथिर्क स्थितीमुळे आपल्या डोक्यात कुठले मेण्टल ब्लॉक असतात, हे एकदा समजून घेतलं की मग मराठी मुलांच्या टॅलेण्टला कुणीच रोखू शकत नाही. हे लक्षात घेऊन 'करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे' या विषयावर प्रसिद्ध कौन्सेलर वृषाली आठल्ये अनुभव मांडतील.

घाई-गडबडीतही कसं निवडाल करिअर

बारावीचा रिझल्ट लागलाय. दहावीचा रिझल्ट लवकरच लागेल. त्यामुळे करिअर निवडण्यात फारसा वेळ नाही. पण अशावेळेस म्हणजे घाईगडबडीतही करिअर कसं निवडता येईल, या विषयावर ग्रोथ सेण्टरच्या सुचित्रा सुवेर् बोलतील. घाईतही माहिती कशी मिळवावी आणि निर्णय करताना कोणती काळजी घ्यावी, असा हा विषय आहे. शिवाय हे टाळण्यासाठी करिअर प्लॅनिंगविषयीही त्या बोलणार आहेत.

एज्युकेशन लोन्स कसे मिळवाल?

सध्या शिक्षण महाग झालंय. पण एज्युकेशन लोन्स हा यावर पर्याय आहे. हा खूप महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषयावर या विषयातले तज्ज्ञ माहिती देतील. कोणत्या कोर्सला, कोणती बँक कशी कर्ज देते किंवा लोनसाठी अॅपिअर कसं होता येईल याची सगळी माहिती यावेळी दिली जाईल.

बोला बिनधास्त

हे मार्गदर्शन पार पडल्यावर तुम्हाला या तज्ज्ञांशी बोलून तुमच्या शंकांचं समाधान करून घेता येईल. या थेट इण्टरअॅक्टिव सेशनमध्ये तुम्ही आधी लिहून प्रश्न विचारू शकता. त्यातील निवडक आणि अधिकाधिक प्रश्नावर एक्स्पर्ट्स उत्तरं देतील.

घोकंपट्टी ते आयटीबीटी फास्ट फॉर्वर्ड


'बे एके बे' म्हणत घोकंपट्टी करत परंपरागत व्यवस्थेला धक्का न देता त्याच त्या चाकोरीभोवती फिरणाऱ्या शिक्षण पद्धत
ीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणारी पिढी पूवीर् भांबावलेली असायची. वास्तवतेची जाण आल्यावर आपण नक्की इतकी वषेर् काय शिकलो, याचे पुनरावलोकन करत बसायची. तेव्हा त्यांच्या ध्यानात यायचं की, हे सर्व पुस्तकी होतं. खरं जग निराळंच आहे. मग वास्तव जगाची ओळख सुरू व्हायची. तोपर्यंत बराचसा काळ निघून जायचा...ही परिस्थिती आता बदललीय. फास्ट फूडच्या या जगात शिक्षणही तसंच झालंय. स्पधेर्च्या वर्तुळात राहाताना बदलाच्या वाऱ्यांना समाजावून घेऊन तावूनसुलाखून यशाच्या शिखरावर पोहोचणारी नवी पिढी उदयास आली आहे. त्याला कारण शिक्षणाचे बदललेले स्वरूप!

जागतिक स्पधेर्च्या या युगात येणाऱ्या समस्यांना तोंड देणारं, कल्पनांना मूर्त स्वरूप देणारं शिक्षण आता अपेक्षित आहे. त्या अपेक्षांची पूतीर् करणारे अनेकविध अभ्यासक्रम निर्माण होऊ लागले आहेत. परंपरागत शिक्षण पद्धतीला छेद देऊन नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भक्कम मनोधैर्य आणि व्यापक कल्पनादृष्टी असलेले विद्याथीर् सध्याच्या शिक्षणपद्धतीतून घडताना दिसतात. पूवीर् दहावी, बारावी, पदवी आणि त्यानंतर ठराविक अभ्यासक्रम असायचे. ते पूर्ण करून स्वप्न पूर्ण केलं जायचं. आता येणारी प्रत्येक पहाट काहीतरी नवीन घेऊन येत असल्यानं त्या नव्याशी जुळवून घेणारे अभ्यासक्रम येऊ लागलेत.

महाराष्ट्राचा विचार केला, तर ज्ञानाची ही गंगोत्री विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवण्यासाठी अनेक विद्यापीठे आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात विविध विद्यापीठे सुरू करून प्रत्येकाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ यांचा उल्लेख करावा लागतो. या विद्यापीठांशिवाय कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी देणारी तसेच अन्नधान्याची, फळेफुलांची कमतरता राहू न देण्यासाठी संशोधनाचे काम करणारी कोकण कृषी विद्यीपीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठेही आहेत. बदलणाऱ्या समाजव्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करणारी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांद्वारे वेगळ्या क्षेत्रात तरुणांना काम करता येते. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय ही भाषांच्या बदलत्या प्रवाहांची ओळख करून देणारी विद्यापीठेही आहेत. आयआयटीद्वारे संशोधनाच्या विश्वात विद्यार्थ्यांना काम करता येते. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठही आहे.

या विद्यापीठांबरोबरच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक यासाठी असणाऱ्या प्रचलित कोसेर्ससह सध्याच्या काळात नवनवीन कोसेर्सद्वारे करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. एमबीए, ट्यूरिझमच्या क्षेत्रात अनेक कोसेर्स असून ते पूर्ण करून करिअर घडवता येते. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात एरॉनॉटिकल इंजिनियरिंगला जास्त महत्त्व आले आहे. अॅव्हिएशन कोसेर्सलाही तरुणांची पसंती मिळत आहे. त्यामध्ये फ्लॉईंग ऑपरेशन, एअरक्राफ्ट मेंटेनन्स हे कोर्स आहेत. बँकिंग क्षेत्रात होणारी उलाढाल लक्षात घेता या क्षेत्राला आवश्यक असणारे ज्ञान दिले जाऊ लागले आहे. त्यामध्ये मर्चंड बँकिंग, ट्रेझरी मॅनेजमेंट, मायक्रो अॅण्ड डेव्हलपमेंट फायनान्स, माकेर्टिंग, ह्युुमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स यांचा समावेश आहे.

बिझनेस प्रोसेस आऊटसोसिर्ंगची (बीपीओ) सध्या चलती आहे. त्यासाठी संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय फॅशन डिझाइन, मॉडेलिंग, इंटेरियल डिझाइन, टेक्सटाइल टेक्नॉलॉजी, टेक्सटाइल डिझाइन, फूटवेअर डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन हे कोसेर्स करिअरचे मार्ग खुले करून देऊ लागले आहेत.

- सुजित तांबडे

आजचा दिवस करिअर निवडीचा





ग्लोबलायझेशनमुळे जग खूप जवळ आलं. करिअरचे अनेक ऑप्शन्स ओपन झाले. पण, आजही कित्येकांना करिअरची निवड कशी करायची हे माहित नसतं. हेच लक्षात घेऊन 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी २ वाजता चर्चगेटच्या र्गव्हन्मेण्ट लॉ कॉलेजमध्ये हे सेमिनार होईल.

आपण मराठी पालक आणि मुलं करिअर्स निवडताना नेमके कसे अडखळतो. विशिष्ट ऑप्शनपलिकडे विचारच करत नाही. त्यानिमित्त 'करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे' याविषयावर प्रसिद्ध कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट वृषाली आठल्ये बोलणार आहेत. इतकंच नव्हे, तर सुरू असलेल्या घाई-गडबडीत करिअर कसं निवडावं यावर ग्रोथ सेण्टरच्या सुचित्रा सुवेर् बोलणार आहेत.

बऱ्याचदा चांगले ऑप्शन, करिअर निवडूनही आथिर्क कुवत नसल्यामुळे आपण मार्ग सोडून देतो. पण, त्यासाठी अनेक बँकांनी, संस्थांनी शैक्षणिक कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एज्युकेशन लोनवर श्यामराव विठ्ठल को-ऑप. बँकेचे चैतन्य पंडित याविषयावर मार्गदर्शन करतील.

शिवाय या तिन्ही तज्ज्ञांबरोबर आपल्या शंका विचारण्यासाठी उपस्थितांना इण्टरॅक्टिव सेशन्सही आयोजित केलं आहे. त्यातून प्रगतीचा फास्ट ट्रॅक तुमच्यासमोर खुला होईल, हीच अपेक्षा!

आर्टसमधलं करिअर


:


कमी मार्क्स मिळाले, तरच आर्टस् शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेण्ड आता आऊटडेटेड झालाय. करिअर करण्यासाठी म्हणून मुद्दाम विद्यार्थी या क्षेत्राची निवड करू लागले आहेत. म्हणूनच आज ९० टक्के मार्क्स मिळालेले विद्यार्थीही आर्टसकडे वळताहेत.

...........

बारावीचा रिझल्ट लागलाय. आता सगळ्याच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली असेल, ती पुढच्या कोर्सेसच्या प्रवेशासाठी. सायन्सच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल, ती सीईटीच्या रिझल्टची. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील कोसेर्सवर विद्यार्थ्यांच्या नेहमीप्रमाणेच उड्या पडतील. पण, आता फक्त या दोन शाखांपुरते विद्यार्थी मर्यादित राहत नाहीत. आर्टस शाखेतही करिअर घडवण्यासाठी विद्याथीर् वळू लागले आहेत.

कमी मार्क्स मिळाले, तरच आर्ट्स ग्रॅज्युएशन करण्याचा पर्याय आता मागे पडला आहे. लँग्वेज, टीचिंग, लॉ, आर्किओलॉजी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात खास करिअर करण्यासाठी म्हणून विद्यार्थी आर्टस शाखेची निवड करू लागले आहेत. ठरवून घेतलेला हा निर्णय अमलात आणण्यासाठी दहावीपासूनच विद्यार्थी या शाखेची वाट धरू लागले आहेत. आर्ट्स क्षेत्रातील अशाच काही करिअर ऑप्शन्सविषयी...

* आर्टसमध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर एखाद्या विषयात एमए करता येईल. तसंच एमपीएससी, यूपीएससी अशा तत्सम स्पर्धा परीक्षा देण्याचा पर्याय आहे. याशिवाय बीएड, एलएलबी, पीजी इन मॅनेजमेण्ट/एमबीए/एमएमएस तसंच मास कम्युनिकेशन, कंपनी सेक्रेटरीशिप, कॉस्ट अकाऊण्टिंग, सोशल सायन्स, एमएसडब्ल्यू, जर्नलिझम आदी कोसेर्स करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

* याशिवाय टीचिंग (प्रायमरी, प्री प्रायमरी, ड्रॉइंग, क्राफ्ट आदी), फाइन आर्ट्स (परफॉमिर्ंग आर्ट्स, कमर्शिअल आर्ट, टेक्सटाइल डिझायनिंग) आदी कोर्सेसचा पर्यायही आहे.

* इतिहास, भूगोल, लॉजिक, इकॉनॉमिक्स, इंग्लिश लिटरेचर, सायकोलॉजी, पोलिटिकल सायन्स, सोशल सायन्स या विषयांमध्ये बीए किंवा एमए करून करिअर डिझाइन करता येईल.

सोशल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर सोशल वर्कमध्ये पीजी करता येईल. सोशल वर्कचा बॅचलर कोर्सही उपलब्ध आहे. बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी, खाजगी तसंच कॉपोर्रेट सेक्टरमध्येही जॉब मिळू शकतात.

पोलिटिकल सायन्स, सोशल सायन्स या विषयांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणं थोडं सोपं होतं.

पीजी करण्यासाठी इण्डॉलॉजी किंवा आन्थ्रोपोलॉजीसारखा विषय घेतल्यास अनेक रिसर्च प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

* संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन करणाऱ्यांना आज फारशा संधी उपलब्ध नाहीत. न्यूजरीडर किंवा शिक्षक तसंच स्वत:चे क्लासेस घेणे एवढेच मर्यादित पर्याय आहेत.

* कोणत्याही भाषेचा (मराठी, इंग्रजी साहित्याचा) अभ्यास करून जर्नलिस्ट, कॉपी रायटर, शिक्षक, ट्रान्सलेटर, न्यूज रीडर आदी जॉब करता येऊ शकतात.

* फॉरेन लँग्वेज शिकल्यास ट्रान्सलेटर, इण्टरप्रीटर किंवा एम्बसीमध्ये जॉब मिळू शकतो. शिवाय स्वत:चे क्लासेसही घेता येतात.

* नेहमीच्या विषयांपेक्षा ग्रॅज्युएशनसाठी नेहमीच्या विषयांऐवजी आकिर्ओलॉजी, आन्थ्रोपोलॉजी, अॅक्च्युरिअल सायन्स अशा विषयांची निवड करता येईल.

* इकॉनॉमिक्समध्ये हायर स्टडीज करून इकॉनॉमिक अॅनालिस्ट, रिसर्चर आदी काम करता येईल.

प्रोफेसर, स्टॉक माकेर्ट, इन्शुरन्स एजन्सीज, विविध कंपन्यांमध्ये कन्सल्टण्ट, इन्व्हेस्टमेण्ट अॅनालिस्ट म्हणून काम करता येतं.

* सायकोलॉजीमध्येही चाइल्ड, बीहेवरिअल, क्लिनिकल, इण्डस्ट्रिअल अशा कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करता येईल. हल्ली या प्रोफेशनल्सना खूप मागणी येऊ लागली आहे.

* इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचं कॉम्बिनेशन घेऊन ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रेड अॅनालिस्ट, फायनान्शिअल अॅनालिस्ट म्हणून काम करता येतं. तसंच बँकेतही नोकरीसाठी अर्ज करता येईल.

* मीडियामध्ये स्पेशलायझेशन करायचं असल्यास बारावीनंतर बॅचलर ऑफ मास मीडिया किंवा ग्रॅज्युएशननंतर जर्नलिझम, मास कम्युनिकेशन करता येईल. याशिवाय पब्लिक रिलेशन किंवा अॅडव्हर्टायझिंग हे पर्यायही आहेत.

* पुस्तकांची किंवा वाचनाची आवड असेल, तर लायब्ररी सायन्सचा अभ्यास करता येईल.

* आर्किओलॉजी, म्युझिओलॉजी हे विषय इतिहासाशी संबंधित आहेत. उत्खननशास्त्र, पुरातत्वशास्त्र, संग्रहालयशास्त्र हे यातील स्पेशलायझेशनचे विषय म्हणता येतील. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये या संदर्भातील पीजी कोसेर्स उपलब्ध आहेत.

* याशिवाय हॉटेल मॅनेजमेण्ट, फॅशन डिझायनिंग, ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम अशा कोसेर्सचाही पर्याय आहे.

original at - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4637213.cms

welcome to our page

hi friends welcome to our page !

this is place for all who belongs to Ashram shala any how.

aashram schools are run by ITDP [Integrated Trbal Developement Project Dahanu] [Ekatmik aadivasi vikas prakalp dahanu] which is playing important role to educated our tribals,runs many programmes for tribal developement...

# main aim behind creating this page is -
- connect the past students from ashram shala
- connect professionals & students to share knowledge & career related issues
- to collect feedback & improvement opporunities for better life of tribal students
- this place is to share opinion/ suggestions about improving the performance of ITDP work. at many places ITDP's work can be done in better way, so please list the suggestions.

this is like allumuni of all past student of Govt Ashram school (shashkiy aashram shala )..

so please help our students for there bright future & also to ITDP to do work in better way.

join AYUSH mail blast at adiyuva@gmail.com





our pages -

www.adiyuva.in

www.warli.adiyuva.in

www.dahanu.adiyuva.in

www.peoples.adiyuva.in

www.ayi.adiyuva.in

www.shala.adiyuva.in

www.talasari.adiyuva.in

www.kasa.adiyuva.in

www.aba.adiyuva.in

www.manus.adiyuva.in
Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More