कमी मार्क्स मिळाले, तरच आर्टस् शाखेला प्रवेश घेण्याचा ट्रेण्ड आता आऊटडेटेड झालाय. करिअर करण्यासाठी म्हणून मुद्दाम विद्यार्थी या क्षेत्राची निवड करू लागले आहेत. म्हणूनच आज ९० टक्के मार्क्स मिळालेले विद्यार्थीही आर्टसकडे वळताहेत.
...........
बारावीचा रिझल्ट लागलाय. आता सगळ्याच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली असेल, ती पुढच्या कोर्सेसच्या प्रवेशासाठी. सायन्सच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल, ती सीईटीच्या रिझल्टची. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील कोसेर्सवर विद्यार्थ्यांच्या नेहमीप्रमाणेच उड्या पडतील. पण, आता फक्त या दोन शाखांपुरते विद्यार्थी मर्यादित राहत नाहीत. आर्टस शाखेतही करिअर घडवण्यासाठी विद्याथीर् वळू लागले आहेत.
कमी मार्क्स मिळाले, तरच आर्ट्स ग्रॅज्युएशन करण्याचा पर्याय आता मागे पडला आहे. लँग्वेज, टीचिंग, लॉ, आर्किओलॉजी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात खास करिअर करण्यासाठी म्हणून विद्यार्थी आर्टस शाखेची निवड करू लागले आहेत. ठरवून घेतलेला हा निर्णय अमलात आणण्यासाठी दहावीपासूनच विद्यार्थी या शाखेची वाट धरू लागले आहेत. आर्ट्स क्षेत्रातील अशाच काही करिअर ऑप्शन्सविषयी...
* आर्टसमध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर एखाद्या विषयात एमए करता येईल. तसंच एमपीएससी, यूपीएससी अशा तत्सम स्पर्धा परीक्षा देण्याचा पर्याय आहे. याशिवाय बीएड, एलएलबी, पीजी इन मॅनेजमेण्ट/एमबीए/एमएमएस तसंच मास कम्युनिकेशन, कंपनी सेक्रेटरीशिप, कॉस्ट अकाऊण्टिंग, सोशल सायन्स, एमएसडब्ल्यू, जर्नलिझम आदी कोसेर्स करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
* याशिवाय टीचिंग (प्रायमरी, प्री प्रायमरी, ड्रॉइंग, क्राफ्ट आदी), फाइन आर्ट्स (परफॉमिर्ंग आर्ट्स, कमर्शिअल आर्ट, टेक्सटाइल डिझायनिंग) आदी कोर्सेसचा पर्यायही आहे.
* इतिहास, भूगोल, लॉजिक, इकॉनॉमिक्स, इंग्लिश लिटरेचर, सायकोलॉजी, पोलिटिकल सायन्स, सोशल सायन्स या विषयांमध्ये बीए किंवा एमए करून करिअर डिझाइन करता येईल.
सोशल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर सोशल वर्कमध्ये पीजी करता येईल. सोशल वर्कचा बॅचलर कोर्सही उपलब्ध आहे. बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी, खाजगी तसंच कॉपोर्रेट सेक्टरमध्येही जॉब मिळू शकतात.
पोलिटिकल सायन्स, सोशल सायन्स या विषयांचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणं थोडं सोपं होतं.
पीजी करण्यासाठी इण्डॉलॉजी किंवा आन्थ्रोपोलॉजीसारखा विषय घेतल्यास अनेक रिसर्च प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
* संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन करणाऱ्यांना आज फारशा संधी उपलब्ध नाहीत. न्यूजरीडर किंवा शिक्षक तसंच स्वत:चे क्लासेस घेणे एवढेच मर्यादित पर्याय आहेत.
* कोणत्याही भाषेचा (मराठी, इंग्रजी साहित्याचा) अभ्यास करून जर्नलिस्ट, कॉपी रायटर, शिक्षक, ट्रान्सलेटर, न्यूज रीडर आदी जॉब करता येऊ शकतात.
* फॉरेन लँग्वेज शिकल्यास ट्रान्सलेटर, इण्टरप्रीटर किंवा एम्बसीमध्ये जॉब मिळू शकतो. शिवाय स्वत:चे क्लासेसही घेता येतात.
* नेहमीच्या विषयांपेक्षा ग्रॅज्युएशनसाठी नेहमीच्या विषयांऐवजी आकिर्ओलॉजी, आन्थ्रोपोलॉजी, अॅक्च्युरिअल सायन्स अशा विषयांची निवड करता येईल.
* इकॉनॉमिक्समध्ये हायर स्टडीज करून इकॉनॉमिक अॅनालिस्ट, रिसर्चर आदी काम करता येईल.
प्रोफेसर, स्टॉक माकेर्ट, इन्शुरन्स एजन्सीज, विविध कंपन्यांमध्ये कन्सल्टण्ट, इन्व्हेस्टमेण्ट अॅनालिस्ट म्हणून काम करता येतं.
* सायकोलॉजीमध्येही चाइल्ड, बीहेवरिअल, क्लिनिकल, इण्डस्ट्रिअल अशा कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करता येईल. हल्ली या प्रोफेशनल्सना खूप मागणी येऊ लागली आहे.
* इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचं कॉम्बिनेशन घेऊन ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रेड अॅनालिस्ट, फायनान्शिअल अॅनालिस्ट म्हणून काम करता येतं. तसंच बँकेतही नोकरीसाठी अर्ज करता येईल.
* मीडियामध्ये स्पेशलायझेशन करायचं असल्यास बारावीनंतर बॅचलर ऑफ मास मीडिया किंवा ग्रॅज्युएशननंतर जर्नलिझम, मास कम्युनिकेशन करता येईल. याशिवाय पब्लिक रिलेशन किंवा अॅडव्हर्टायझिंग हे पर्यायही आहेत.
* पुस्तकांची किंवा वाचनाची आवड असेल, तर लायब्ररी सायन्सचा अभ्यास करता येईल.
* आर्किओलॉजी, म्युझिओलॉजी हे विषय इतिहासाशी संबंधित आहेत. उत्खननशास्त्र, पुरातत्वशास्त्र, संग्रहालयशास्त्र हे यातील स्पेशलायझेशनचे विषय म्हणता येतील. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये या संदर्भातील पीजी कोसेर्स उपलब्ध आहेत.
* याशिवाय हॉटेल मॅनेजमेण्ट, फॅशन डिझायनिंग, ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम अशा कोसेर्सचाही पर्याय आहे.
|
|