घसईतील आश्रमशाळेतील गोदामात गणवेशाचे कापड पडले आहे; पण शिलाईचा पत्ता नसल्याने अशा प्रकारे फाटके गणवेश घालण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. (छायाचित्र - विभव बिरवटकर)
ठाणे, ता. 3 - आश्रमशाळांच्या गोदामात गणवेशाचे कापड आहे; पण त्यानंतरही विद्यार्थ्यांना फाटके कपडे घालावे लागत आहेत. अकरावीच्या मुलींनाही आंघोळीसाठी मोकळ्या जागेचा वापर करावा लागत आहे. पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे. एक महिना झाला तरी आश्रमशाळेत चपातीचा तुकडा पाहावयास मिळालेला नाही. शाळेतील फरशा उखडल्या गेल्या आहेत... ही दुरवस्था आहे ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांची. विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आज अचानक आश्रमशाळांना भेट देऊन अनेक गंभीर घटना उघडकीस आणल्या. आश्रमशाळांची परिस्थिती त्वरित न बदलल्यास विधानसभेचे अधिवेशन रोखून धरण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.
आज कदम यांनी ठाणे जिल्ह्यातील पिवळी, घारगाव, अघई
घसई आदी आश्रमशाळांची पाहणी केली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, माजी आमदार दौलत दरोडा आदी उपस्थित होते.
पिवळी गावातील आश्रमशाळेत मुलांच्या स्वच्छतागृहाचा वापर भंगार ठेवण्यासाठी केला जात आहे. मुलांचे कपडे फाटलेले आहेत. थंडीच्या दिवसांतही थंडगार पाण्याने आंघोळ उरकावी लागत आहे. कहर म्हणजे ठेकेदाराचे वडील वारल्यामुळे मुलांना एक महिनाभर चपातीच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अघई आश्रमशाळेत कीड लागलेला गहू चपातीसाठी आणलेला आढळून आला. महिनाभर विद्यार्थ्यांना साबण उपलब्ध करून न देता खोबरेल तेल आणि टूथपेस्टच्या नावाखाली नावेही माहिती नसलेल्या कंपन्यांची उत्पादने उपलब्ध करून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. वाड्यातील घारगावमधील आश्रमशाळेतील मुलांना स्वच्छतागृह आणि आंघोळीसाठी तीन किलोमीटरवरील नदीचा आसरा घ्यावा लागत आहे; त्यात अकरावीत शिकत असलेल्या मुलींचाही समावेश आहे. या ठिकाणी गहूच संपला असल्याने चपाती मिळत नसल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे कदम यांच्या दौऱ्याची कल्पना आश्रमशाळा चालविणाऱ्यांना आधी मिळूनही शाळांची दुर्दशा एका मर्यादेबाहेर लपवून ठेवणे त्यांनाही अवघड झाल्याचे दिसत होते.
अधिवेशन चालू देणार नाही
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था पाहिल्यावर पुढील अधिवेशनापर्यंत आश्रमशाळांची परिस्थिती न बदलल्यास विधानसभेचे अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा कदम यांनी दिला. कॉंग्रेस आघाडीचे सरकार हे फक्त श्रीमंतांसाठी चालविले जात आहे. त्यांना आदिवासी आणि गोरगरिबांच्या समस्यांबाबत काही देणे-घेणे राहिलेले नाही. या शासनाला पुढील काळात याचा जाब द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.