ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची अवस्था सरकारी व्यवस्थापनाचे धिंडवडे काढणारी आहे.
ठाणे , ता. ४ - "मुकी बिच्चारी कुणी हाका', अशी अवस्था सध्या ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची झाली आहे. या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था सरकारकडे अनेकदा मांडली गेली आहे; परंतु त्यानंतरही सरकारकडून येणारा निधी सरकारी बाबूंकडून नीट वापरला जात नसल्याने या आश्रमशाळांची आणि तेथील विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था कायम आहे. विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी याबाबत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिल्याने या मुलांच्या अवस्थेत फरक पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रामदास कदम ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांची पाहणी करणार असल्याचा निरोप मिळताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. या विभागाने आपल्या परीने सोमवारी सायंकाळी बैठक घेऊन या आश्रमशाळा नीटनेटक्या ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत कदम यांनी या आश्रमशाळांची पाहणी केल्यावर त्यांची अवस्था अद्यापही दयनीय असल्याचे आढळले.
आश्रमशाळांच्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या मुलांना शाळेसाठी अत्यावश्यक सुखसुविधाही पुरविल्या जात नसल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.
शहापूरच्या पिवळी गावातील मुलांच्या स्वच्छतागृहाचा वापर भंगार ठेवण्यासाठी केला जात आहे. येथील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कपडे फाटलेले होते. या थंडीच्या दिवसांत बोरिंगच्या पाण्याखाली आपली आंघोळ त्यांना उरकून घ्यावी लागत आहे. एवढेच नव्हे तर येथील ठेकेदाराच्या वडिलांचे निधन झाल्याने येथील विद्यार्थ्यांना तब्बल एक महिना चपातीचा तुकडा मोडण्यास मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले. अघईच्या शाळेत काल चपाती होती, तर आज नाही अशी परिस्थिती होती. अनेक मुलांच्या अंगावर गणवेश नव्हता. या ठिकाणीही कीड लागलेला गहू आढळला. खोबरेल तेल आणि टूथपेस्ट आतापर्यंत अज्ञात असलेल्या कंपन्यांचे उपलब्ध होते. गोदामात गणवेशाचे तागे पडले आहेत, पण मुलांच्या अंगावर फाटके कपडे, अशी परिस्थिती येथील होती. या मुलांच्या अंगाला आणि कपड्याला तब्बल एक महिना साबण लागलेला नव्हता. घारगांवच्या मुलांना तर आंघोळीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे आढळले. येथील अकरावीच्या मुलींनाही आंघोळीसाठी जवळच्या ओढ्याचा अथवा नदीचा आसरा घ्यावा लागत आहे. शाळेतील गहूच संपल्याने जेवणातील चपातीला काट मारण्यात आली आहे. यापूर्वी आश्रमशाळेतील व्यवस्थापन आपल्या अडचणी सांगताना कचरत असत. पण यावेळी ते खुलेपणाने बोलत होते. तसेच येथील मुलेही बोलू लागली आहेत. आश्रमशाळांचा प्रश्न नजीकच्या काळात गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.