मुंबई - मनोर परिसरातील गोवाडे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याच्या आरोपासंदर्भात उद्या तिची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला.
मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी या विषयावरील एका पत्राची स्वतःहून दखल घेऊन त्याचे रूपांतर जनहित याचिकेत केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आज खंडपीठापुढे झाली. ठाण्यातील सरकारी रुग्णालयाच्या 2 जानेवारीच्या अहवालानुसार ही विद्यार्थिनी गर्भवती होती. डहाणूतील प्राथमिक आरोग्य केंद्राने 24 जानेवारी रोजी दिलेल्या अहवालानुसार ही मुलगी गर्भवती नव्हती. याचा अर्थ या कालावधीत तिचा गर्भपात झाला आहे का, असा प्रश्न खंडपीठापुढे उपस्थित झाला. त्यामुळे खंडपीठाने वरील आदेश दिला. या मुलीला उद्या सकाळी नऊ वाजता जे. जे. रुग्णालयात आणावे. तेथे स्त्री-रोगतज्ज्ञांनी तिची वैद्यकीय तपासणी करावी. ती मुलगी गर्भवती होती का? असल्यास तिचा गर्भपात झाला का? हा गर्भपात मुद्दाम घडवून आणला की तो नैसर्गिकरीत्या झाला? आदी प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांनी द्यावीत व आपला अहवाल सीलबंद पाकिटात न्यायालयास द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होईल. या प्रकरणी खंडपीठाने ऍमेकस क्युरी (न्यायमित्र) म्हणून ऍड्. श्रीमती गीता मुळेकर यांची नियुक्ती केली आहे.
विद्यार्थी मृत्यूंचीही दखल
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचीही दखल खंडपीठाने घेतली आहे. या मुलांना कोणता आजार झाला होता? त्यांच्यावर काय उपचार करण्यात आले? त्यांना घरी केव्हा व का पाठविण्यात आले? ही मुले कशाने मृत्युमुखी पडली? आदी प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावीत, असे खंडपीठाच्या आदेशात म्हटले आहे.