धुळे, ता. ६ - आदिवासी शासकीय आश्रमशाळेत मुलींवर होणारे अत्याचार व विविध समस्यांसाठी आदिवासी एकता परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हा प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले. त्याचा आशय असा : आदिवासी आश्रमशाळेतील मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच सर्वच आदिवासी आश्रमशाळांत अनेक समस्या आहेत. त्याचा परिषदेने निषेध केला आहे. सुरगाणा-करंजुल (जि. नाशिक) येथील आश्रमशाळेतील मुलीवर अत्याचार झाला. शासकीय वसतिगृहातील व आश्रमशाळेतील विद्यार्थी शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन करतात.

पाच वर्षांत समस्यांचे वाढते प्रमाण आहे. समस्या सोडविण्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांना दम भरला जातो, अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. कुवटी (ता. किनवट) येथे आदिवासी युवतीवर सामूहिक बलात्कार झाला, संबंधितावर त्वरित गुन्हा दाखल करावा.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात आदिवासींना "वनवासी' असा प्रयोग केला असून, त्यात त्वरित दुरुस्ती करावी, शासकीय वसतिगृहांत मूलभूत सुविधा पुरवाव्यात, याबाबत आदिवासी विकासमंत्र्यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन एकता परिषदेने निवेदनात केले आहे. निवेदनावर भगवान वळवी, राजकुमार सोनवणे, ऍड. अभिजित वसावे, राकेश पाडवी आदींच्या सह्या आहेत.