ठाणे - आश्रमशाळेत तासिकेवर शिकविणाऱ्यांना शिक्षणसेवक म्हणून नियुक्त करा; अन्यथा शिक्षणसेवकांची मार्चमध्ये होणारी परीक्षा घेऊ देणार नाही, असा इशारा श्रमजीवी शिक्षक कामगार संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिला आहे.
वागळे इस्टेट येथील जिल्हा विकास कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनानंतर याबाबतचे निवेदन त्यांनी ठाणे जिल्हा आदिवासी विकास अपर आयुक्त पी. बी. करवंदे यांना दिले.
जिल्ह्यातील 87 आश्रमशाळांमध्ये तात्पुरत्या सेवेतील 200 शिक्षकांनी विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. प्राथमिक शाळेत शिकविण्याचे काम करणारे शिक्षक 12 रुपये तासाने काम करीत आहेत. त्यांना महिन्याला एक हजार 200 रुपये दिले जातात; तर माध्यमिक शिक्षकांना तीन हजार 600 व 12 वीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना केवळ चार हजार रुपये आदिवासी विभागाकडून मासिक वेतन दिले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आश्रमशाळेत सर्वाधिक 24 तास काम करणाऱ्या या शिक्षकांना सेवेत कायम न करता शिक्षणसेवकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; पण या तात्पुरत्या सेवेत असलेल्या शिक्षकांना प्रथम शिक्षणसेवक म्हणून सेवेत सामावून घेण्याची मागणी शिक्षकांनी या धरणे आंदोलनाद्वारे केली आहे.